
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष आता राष्ट्रपतींच्या सन्मानावरून अधिकच पेटला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या बंगाल दौऱ्यावरून भाजपने केलेल्या टीकेला ममता बॅनर्जी यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. कोलकाता येथील धरणे आंदोलनादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना फोटो दाखवत, “राष्ट्रपतींचा खरा अवमान कोण करतंय?” असा थेट सवाल उपस्थित केला.
नेमका वाद काय?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या बंगाल दौऱ्यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रोटोकॉलनुसार त्यांच्या स्वागताला उपस्थित नव्हत्या. यावरून पंतप्रधान मोदींनी महिला दिनी मातृशक्तीचा अपमान केल्याची टीका ममतांवर केली होती. याला उत्तर देताना ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले की, त्या सध्या बंगालच्या हक्कांसाठी धरणे आंदोलनावर बसल्या आहेत आणि या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत त्यांनी आधीच लेखी आक्षेप नोंदवला होता.
सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारत रत्न’ प्रदान करतानाचा एक फोटो सर्वांना दाखवला. त्या म्हणाल्या की, “या फोटोत पाहा, देशाच्या राष्ट्रपती आणि एक आदिवासी महिला नेत्या उभ्या आहेत, तर पंतप्रधान मोदी आरामात बसलेले आहेत. तुम्ही राष्ट्रपतींचा सन्मान करत नाही आणि आम्हाला शिकवता? आम्ही राष्ट्रपतींचा मनापासून आदर करतो, पण भाजप केवळ राजकारण करते.”
ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर आरोप केला की, जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हा जाणीवपूर्वक त्यांना आणि त्यांच्या सरकारला लक्ष्य केले जाते. प्रत्येक वेळी आम्हालाच दोषी का ठरवले जाते? राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाच्या ठिकाणावरून मी आधीच पत्र लिहून आणि फेसबुकद्वारे आक्षेप घेतला होता, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी केलेल्या मातृशक्तीचा अपमान या आरोपावर बोलताना ममता म्हणाल्या, “महिलांचा सन्मान कसा करायचा हे कुणी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. मी लहानपणापासून ही परंपरा पाळत आली आहे. माझ्या सरकारने महिलांच्या अधिकारांसाठी नेहमीच काम केले आहे आणि मी महिला दिन हजार वेळा साजरा करायला तयार आहे.”
The Prime Minister keeps making grand claims about respecting the President’s office.
Let us take a good look at this photo. The country’s first tribal woman President stands while the Prime Minister sits comfortably in his chair.
All proclamations of respect for the… pic.twitter.com/LUzw5wW4dW
— All India Trinamool Congress (@AITCofficial) March 8, 2026




























































