Viral Video – दुबईवर ड्रोन हल्ल्याचा इशारा, विमानतळ तातडीने केले रिकामे?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Passengers At Dubai Airport Sent To Shelter Amid Iran Missile Threat

मध्यपूर्वेतील विविध देशांमध्ये प्रवासी मोठ्या प्रमाणात अडकून पडले आहेत. सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू आहे. मात्र विमानतळांना लक्ष्य करण्यात येत असल्याने प्रवासी घाबरलेले आहेत. हल्ल्याची सूचना मिळताच विमानतळावरील प्रवाशांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात येते. असाच दुबई विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची पुस्टी सामना करत नाही.

एनडीटीव्हीने यासंदर्भातील एक व्हिडीओ आणि बातमी प्रसिद्ध केली आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) हवाई संरक्षण दलाने (Air Defences) संभाव्य क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर, मंगळवारी दुबई विमानतळ रिकामे करण्यात आले. आशिया आणि युरोपला जोडणारा महत्त्वाचा दुवा आणि जगातील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक असलेल्या या विमानतळावरील प्रवाशांना तातडीने ‘बॉम्ब शेल्टर’मध्ये (सुरक्षित तळघर) हलवण्यात आले. अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाच्या ११ व्या दिवशी हा तणाव पाहायला मिळाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट्सच्या आकडेवारीनुसार, दुबई विमानतळावर येणारी सर्व विमाने फुजैराह आणि अल-एन शहरांजवळ ‘होल्डिंग पॅटर्न’मध्ये (हवेतच घिरट्या घालणे) थांबवण्यात आली होती. ही शहरे विमानतळापासून १११ ते १३४ किमी अंतरावर आहेत.

यापूर्वी शनिवारीही, इराणकडून होत असलेल्या हल्ल्यांशी संबंधित एका ड्रोनला पाडत असताना, त्याचे अवशेष टर्मिनलजवळ पडल्याने दुबईतील विमान वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली होती.

दरम्यान, रस्ते, हवाईमार्ग आणि सागरी मार्ग सगळेच जवळपास ठप्प असल्याने मध्यपूर्वेत प्रवाशांचा मोठ्याप्रमाणात खोळंबा झाला आहे. समुद्रात, बंदरात एकट्या हिंदुस्थानचे जवळपास 40 हजार कंटेनर अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर जगभरात किती मोठे आर्थिक नुकसान होत आहे याचा अंदाज बांधता येईल.