ठरलं! जेईई अ‍ॅडव्हान्सची 17 मे रोजी परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) रुडकीने जेईई अ‍ॅडव्हान्स्ड 2026 साठी 23 एप्रिलपासून नोंदणी सुरू होणार आहे. यासाठी उमेदवार 23 एप्रिल ते 2 मेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतील. 17 मे रोजी परीक्षा घेतली जाईल. उमेदवार 11 ते 17 मे पर्यंत आपले अ‍ॅडमिट कार्ड डाऊलोड करू शकतील. या परीक्षेचा पहिला पेपर सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान होईल. परीक्षा देण्यासाठी उमेदवाराने 2025-26 मध्ये परीक्षा दिलेली असावी. तसेच त्याने फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित विषय घेतलेला असावा.