
मेटाचा (Meta) सोशल मीडिया प्लटफॉर्म Instagram सध्या सर्वाधिक लोकप्रिय अॅप आहे. इन्फ्लुएन्सर मोठ्या प्रमाणात येथे कंटेंट पोस्ट करतात. सोबतच फॉलोअर्स, युजर्स मेसेज करण्यासाठी या माध्यमाचा वापर करतात. मात्र हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटेपासून युजर्सना इन्स्टाग्राम वापरण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
अनेक युजर्सनी ‘डायरेक्ट मेसेज’ (DM) पाठवता येत नसल्याच्या किंवा इनबॉक्स लोड होत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. वेबसाइटच्या डाऊन टाइमचा मागोवा घेणाऱ्या ‘डाऊनडिटेक्टर’ (Downdetector) या पोर्टलवर सकाळी ८:४५ च्या सुमारास तक्रारींचा मोठा ओघ पाहायला मिळाला.
नेमक्या काय आहेत अडचणी?
डाऊनडिटेक्टरच्या आकडेवारीनुसार, सुमारे ७७ टक्के युजर्सनी अॅप वापरताना समस्या येत असल्याचे सांगितले, तर १३ टक्के युजर्सना वेबसाइटवर अडचणी आल्या. तसेच ११ टक्के युजर्सना सर्व्हर कनेक्शनशी संबंधित समस्या जाणवल्या. आउटेज मॅपनुसार (Outage Map), लॉस एंजेलिस, फिनिक्स, शिकागो, वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्क यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये याचा सर्वाधिक परिणाम दिसून आला.
सोशल मीडियावर संताप
everyone coming to X to see if Instagram is down😭 #Instagramdown
pic.twitter.com/IcHmPRZ17o— . (@goatspriv) March 11, 2026
instagram going down immediately after i finally respond to my friend i left on delivered for 2 days pic.twitter.com/YJVlDbiZwR
— jd (@wingliders) March 11, 2026
My Instagram messages aren’t working at all anymore pic.twitter.com/84on9CpdnH
— Aster/vex ( vgencomms open!!) (@uniinya) March 11, 2026
instagram down whilst i was flirting PLEASE im trying to secure the bag pic.twitter.com/fMMjFzL2lL
— seánie⋆.˚⟡🏴 (@getahours) March 11, 2026
इन्स्टाग्रामवरील या तांत्रिक बिघाडामुळे युजर्सनी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला संताप व्यक्त केला. ‘इन्स्टाग्राम डाऊन आहे का? माझे डीएम काम करत नाहीत,’ अशी विचारणा एका युजरने केली. तर दुसऱ्या एका युजरने गमतीने म्हटले की, ‘मी कोणाला तरी मेसेज पाठवला आणि लगेच इन्स्टाग्राम ‘विचित्र’ वागू लागले.’ अनेकांनी डाऊनडिटेक्टरवर कमेंट्स करून मेसेजिंग फिचर पूर्णपणे ठप्प झाल्याचे सांगितले.
मेटा आणि मार्क झुकरबर्ग यांच्याकडून या तांत्रिक बिघाडाबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा सार्वजनिक निवेदन जारी करण्यात आलेले नाही. तांत्रिक बिघाडामुळे केवळ मेसेजच नव्हे, तर काही युजर्सना पोस्ट पब्लिश करण्यात आणि कंटेंट पाहण्यातही अडचणी येत असल्याचे समोर आले आहे.
इन्स्टाग्राम हे तरुणांचे आवडते प्लॅटफॉर्म आहे. इथे अवघ्या तीस सेकंदात विविध क्षेत्रातील माहिती, गंमतीशीर व्हिडीओ पाहायला मिळतात.
























































