
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरील अविश्वास प्रस्तावानंतर आता देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणला जाणार आहे. तृणमूल काँग्रेसने यासाठी पुढाकार घेतला आहे.
लोकसभेतील 120हून अधिक खासदार व राज्यसभेतील 60 पेक्षा अधिक खासदारांनी महाभियोगाच्या प्रस्तावावर स्वाक्षऱया केल्या आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही सभागृहाच्या सचिवालयाला हा प्रस्ताव दिला जाईल, अशी माहिती तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी दिली.
ज्ञानेश कुमारांचे वर्तन पक्षपाती आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मतदार फेरतपासणीमध्ये अनेक घोटाळे आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.


























































