अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी, मध्यरात्री आले धमक्यांचे फोन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून अंबादास दानवे यांना मध्यरात्रीच्या सुमारास सातत्याने धमक्यांचे फोन येत आहेत. या प्रकरणी अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांची भेट घेत त्यांना याबाबत पत्र दिले आहे.