
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी गुडन्यूज आहे. रेल्वे भरती बोर्डने असिस्टंट लोको पायलट पदांची भरती जाहीर केली आहे. देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये तब्बल 11,127 पदे भरली जाणार आहेत. असिस्टंट लोको पायलट पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 15 मे 2026 पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांना 14 जून 2026 (रात्री 12 वाजेपर्यंत) अर्ज करता येणार आहेत. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असून, उमेदवारांना अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in वर अर्ज भरावा लागेल.
सविस्तर जाहिरात लवकरच
रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले की, ही सध्या इंडिकेटिव नोटीस आहे. उमेदवारांना आधीपासून तयारी करता यावी यासाठी ही माहिती देण्यात आली आहे. लवकरच सविस्तर अधिसूचना प्रसिद्ध होणार असून, त्यामध्ये पात्रता, परीक्षा पद्धती, आरक्षण आणि इतर सर्व माहिती दिली जाईल.
यासाठी किमान वय 18 वर्षे, तर कमाल वय 30 वर्षे ही पात्रता आहे. आरक्षित प्रवर्गांना शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
निवड झालेल्या उमेदवारांना पे लेव्हल-2 अंतर्गत रु. 19,900 इतका प्रारंभिक पगार दिला जाईल. याशिवाय इतर भत्ते आणि सुविधादेखील मिळतील.


























































