असं झालं तर… मोबाईल नेटवर्क असूनही कॉल लागत नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीला कॉल केल्यावर आवाज येत नाही. नेटवर्क जरी चांगले असले तरी आवाज येत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात.

कॉल केल्यावर आवाज न येण्याची समस्या वरचेवर असेल तर तर तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये काहीतरी ऑन राहिलेले असेल. त्यामुळे समस्या येते.

तुम्ही विनाकारण बॅटरी सेव्हर मोड
ऑन ठेवला तर कॉल घेण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हाच बॅटरी सेव्हर मोड ऑन करा.

अनेक ठिकाणी 5 जी नेटवर्क नसते. यामुळे 5 जी आणि 4 जीमध्ये स्विच होत राहते. यामुळे कॉल केल्यावर चांगला आवाज येत नाही.

फोन अपडेटची समस्या असू शकते. मोबाईल सॉफ्टवेअर अपडेट नसेल तर अडचणी येऊ शकतात. त्यासाठी मोबाईल सेटिंग्जमध्ये जाऊन अपडेट करा.