गंगा नदीत इफ्तार पार्टी; 14 अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mumbai Crime Delivery Boy Arrested for Theft

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे गंगा नदीपात्रात होडीत बसून इफ्तार पार्टी केल्याप्रकरणी 14 तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. इफ्तार पार्टी करणाऱया तरुणांनी नेमका कोणता कायदा मोडला, असा सवाल काँग्रेसने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी काही तरुणांनी गंगा घाटावर इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीसाठी काही तरुण अस्सी घाटावर एकत्र जमले. तिथे एका मोठय़ा होडीत बसून त्यांनी नमो घाटापर्यंत प्रवास केला. त्यांनी होडीवर नमाज पठण केले व नंतर फलाहार केला. या पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे वाद झाला. संबंधित तरुणांनी चिकनचे तुकडे गंगेत टाकल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. या तरुणांनी पोलिसांच्या हातावर ईदी (भेट) ठेवली नसेल म्हणून ही कारवाई झाली असेल, असा टोला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हाणला.