पॅन कार्डच्या नियमांत 1 एप्रिलपासून मोठे बदल; आता फक्त आधार कार्डने काम भागणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर तुम्ही नवीन पॅन कार्ड काढण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. येत्या 1 एप्रिल 2026 पासून पॅन कार्ड अर्जाच्या नियमांत मोठे बदल होणार असून ही प्रक्रिया आता अधिक कडक आणि पारदर्शक केली जाणार आहे. ‘Income Tax Rules 2026’ अंतर्गत हे बदल लागू केले जात आहेत. आतापर्यंत केवळ आधार कार्डच्या आधारे पॅन कार्डसाठी अर्ज करता येत होता, मात्र नवीन नियमांनुसार आता केवळ आधार पुरेसे नसेल. अर्जदारांना आता जन्मतारखेचा अतिरिक्त पुरावा सादर करणे अनिवार्य असणार आहे.

नवीन नियमांनुसार, पॅन कार्डसाठी जन्म दाखला, मतदार ओळखपत्र, 10 वीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यांपैकी एक कागदपत्र जोडावे लागेल. जर तुम्हाला कमी कागदपत्रांमध्ये पॅन कार्ड बनवायचे असेल, तर 31 मार्च 2026 पूर्वी अर्ज करणे फायदेशीर ठरेल. केवळ अर्जाची प्रक्रियाच नाही, तर पॅन कार्डच्या वापराच्या मर्यादांमध्येही बदल करण्यात आले आहेत. आता वर्षाला 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख जमा किंवा काढण्यासाठी पॅन अनिवार्य असेल. तसेच, मालमत्ता खरेदीसाठी पॅन कार्डची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे, तर 5 लाखांवरील वाहन खरेदी आणि 1 लाखांवरील हॉटेल खर्चासाठी पॅन देणे बंधनकारक असेल.