8 तास आधी तिकीट रद्द केल्यास अर्धेच पैसे मिळणार; प्रवाशांच्या खिशाला कात्री… एप्रिलपासून रेल्वेचे नवीन नियम लागू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळी सुट्टी लागायला अवघे काही दिवस शिल्लक असताना रेल्वेने तिकीट रद्द करण्याचे नियम बदलण्याचे ठरवले आहे. ग्राहकांच्या तिकीट बुकिंग आणि रद्द करण्याच्या नियमांवर रेल्वेने काही बदल केले आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना तिकीट रद्द करताना प्रवासाच्या वेळेनुसार, ठराविक शुल्क भरावे लागणार आहे. याचा थेट परिणाम प्रवाशांच्या खिशावर होणार असून खिशाला कात्री बसणार आहे. रेल्वेचे हे नियम 1 ते 15 एप्रिल दरम्यान लागू केले जाणार आहेत.

रेल्वे प्रवाशांना आता 8 तासाच्या आत तिकीट रद्द केल्यास कोणताही रिफंड मिळणार नाही. तर 24 तास ते 8 तासांदरम्यान तिकीट रद्द केले तर प्रवाशाला केवळ 50 टक्के रिफंड मिळू शकणार आहे. तसेच तीन दिवस म्हणजेच 72 तासांच्या आधी जर तिकीट रद्द केले तरी सुद्धा तिकिटाचे संपूर्ण पैसे प्रवाशाला आता मिळू शकणार नाही. तिकीट रद्द केल्यानंतर प्रवाशाला केवळ 75 टक्के रक्कम दिली जाईल. 25 टक्के रक्कम ही रेल्वे खात्यात जमा होईल. यामुळे पुढील महिन्यापासून रेल्वेचे तिकीट रद्द करणे हे प्रवाशाला परवाडणारे नाही. याआधी तिकीट रद्द केल्यास प्रवाशाला पैसे परत मिळत होते. परंतु, आता तसे होणार नाही. रेल्वेने तिकीट रद्द करण्यासोबत आणखी काही नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जर अखेरच्या वेळी प्रवाशाला श्रेणी बदलायची असेल तर ट्रेन सुटण्याआधी अर्ध्या तासाआधी कोच आणि क्लास बदलण्याचा पर्याय खुला राहील. याचाच अर्थ स्लीपर मधून एसी कोचमध्ये अपग्रेड करता येईल. तसेच बोर्डिग स्टेशनऐवजी दुसऱ्या स्टेशनहून गाडीत चढायचे असेल तर मोबाइल ऍपद्वारे सहज बार्ंडग पॉइंट बदलता येईल.

थलैवाकडून धुरंधर-2’चे कौतुक

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत उर्फ थलैवाने ‘धुरंधर-2’ चित्रपटाचे कौतुक केले आहे. रजनीकांत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ‘धुरंधर-2’ चित्रपटाचे कौतुक केले. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांचेही कौतुक केले आहे.  रणवीर आणि संपूर्ण कास्ट व क्रूचे खूप खूप अभिनंदन… प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहायला हवा. जय हिंद.’ अशी पोस्ट रजनीकांत यांनी केली आहे.  या पोस्टवर दिग्दर्शक आदित्य धर यांनी आभार मानले आहेत.

ऍपलचा 8 जूनपासून डब्ल्यूडब्ल्यूडीसी कार्यक्रम

ऍपल कंपनीने वर्ल्ड वाइड डेव्हलपर्स कॉन्फ्रेन्स 2026 च्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. हा कार्यक्रम 8 ते 12 जून या दरम्यान होणार आहे. या कार्यक्रमात ऍपल कंपनी आयओएस 27 आणण्याची शक्यता आहे. तसेच आयपॅड ओएस, मॅक ओएस आणि टीव्ही ओएस सारखे अन्य ऑपरेटिंग सिस्टमचे नवीन व्हर्जन आणण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम व्हर्च्युअली होणार असून सर्व डेव्हलपर्ससाठी मोफत असणार आहे.