
भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱया अशोक खरातला सुरुवातीच्या गुह्यात न्यायालयीन कोठडी मिळाली होती. दुसऱया गुन्ह्यात विशेष तपासी पथकाने त्याला ताब्यात घेत गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने खरातला सात दिवसांची एसआयटी कोठडी दिली.
सरकारी वकील अॅड. शैलेंद्र बागडे यांनी खरातच्या काळय़ा कृत्याचा पाढा वाचला. ‘तू अप्सरा आहेस’ असे त्याने त्याच्याकडे आलेल्या महिलेला सांगून जाळ्यात ओढले, लैंगिक अत्याचार करून गर्भवती ठेवले. समाजात बदनामी करीन, अशी भीती घालून गोळय़ा, औषधे देवून तिचा गर्भपात केला. त्याला यात कोणी सहकार्य केले, आणखी कोणाचा सहभाग आहे, पीडितेच्या नातेवाईकांकडून त्याने आधार, पॅनकार्डची मागणी कशासाठी केली होती, याचा शोध घ्यायचा असल्याने कोठडीची मागणी केली. त्यावर न्यायालयाने खरातला 8 एप्रिलपर्यंत कोठडी दिली.
























































