
आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेतील १९व्या हंगामातील दुसऱ्या डबल हेडरमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आज हैदराबादमध्ये सामना रंगणार आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौने आतापर्यंत एक सामना खेळला असून, त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. तर ईशान किशनच्या नेतृत्वाखालील हैदराबादने दोन सामन्यांपैकी एक जिंकला आहे. आता लखनौ पहिल्या विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार असले, तरी हैदराबादला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवणे सोपे नसेल.
हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमची खेळपट्टी पारंपरीकरीत्या फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. या मैदानावर अनेकदा उच्च धावसंख्या असलेले सामने पाहायला मिळाले आहेत. आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्कोरही याच मैदानावर झाला आहे. येथे धावांचा पाठलाग करणे तुलनेने सोपे मानले जाते. मागील ५ सामन्यांपैकी ४ सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्यामुळे जर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने २२०च्या आसपास धावा केल्या, तर त्या वाचवता येऊ शकतात. मात्र, सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळण्याची शक्यता आहे. काहीही असले तरी या मैदानावर धावांचा पाऊस पडण्याचीच दाट शक्यता आहे.
IPL 2026 – पहिली साऊथ इंडियन डर्बी आज! बंगळुरू-चेन्नई लढतीची उत्सुकता टिपेला
लखनौ सुपर जायंट्स –
ऋषभ पंत (कर्णधार), अब्दुल समद, आयुष बदोनी, एडन मार्करम, मॅथ्यू ब्रीट्झके, हिम्मत सिंग, निकोलस पूरन, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, अर्शिन कुलकर्णी, मयंक यादव, आवेश खान, मोहसीन खान, मणिमारन सिद्धार्थ, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव, आकाश सिंग, मोहम्मद शमी, अर्जुन तेंडुलकर, वानिंदु हसरंगा, एन्नरीच नॉर्खिया, मुकुल चौधरी, नमन तिवारी, अक्षत रघुवंशी आणि जोश इंग्लिस.
सनराइजर्स हैदराबाद –
पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, आर. स्मरण, ईशान किशन (कर्णधार), हेन्रीच क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामेंदु मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कार्से, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा, जीशान अन्सारी, शिवांग कुमार, सलील अरोरा, साकिब हुसैन, ओंकार तरमाले, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, क्रेन्स फुलेट्रा, लियम लिव्हिंग्टन, शिवम मावी, जॅक इडवर्ड.
























































