
राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये गुवाहटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या सामन्यावर पावसाचे सावट पाहायला मिळत आहे. पावसामुळे नियोजित वेळेत नाणेफेक होऊ शकली नाही. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होणार होती, मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. सध्या पाऊस थांबला असून खेळपट्टीवरील काही कव्हर्स हटवण्यात आले आहेत, परंतु मुख्य कव्हर अजूनही जागेवरच आहे. मैदान सुकवण्यासाठी ग्राऊंडस्टाफ शर्थीचे प्रयत्न करत असून ‘सुपर सोपर्स’ची मदत घेतली जात आहे.
🚨 Update 🚨
Toss is delayed in Guwahati.
Next update to follow once the rain stops.#TATAIPL | #KhelBindaas | #RRvMI pic.twitter.com/cheEGdXSEz
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2026
आयपीएलच्या अधिकृत ‘X’ हँडलवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पाऊस पूर्णपणे थांबल्यानंतरच पुढील अपडेट दिले जाईल. या हंगामात यजमान राजस्थान रॉयल्सचा संघ फॉर्मात असून त्यांनी आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने आतापर्यंत एक विजय आणि एक पराभव स्वीकारला आहे. मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सवर मात केली होती, तर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता हा सामना किती षटकांचा होणार आणि कधी सुरू होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.



























































