ना.म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाची आदित्य ठाकरे यांच्याकडून पाहणी, रहिवाशांच्या समस्यांचा घेतला आढावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाची पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला. तसेच स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि सूचना जाणून घेतल्या.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून ना.म. जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव या बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली होती. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वेळोवेळी या प्रकल्पांना भेट देऊन तेथील कामाच्या प्रगतीचा आढावा घेतात. आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी ना.म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाला भेट दिली. या वेळी शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे यांच्यासह रहिवाशी उपस्थित होते.

ना.म. जोशी मार्ग येथील 32 चाळींमधील 2560 रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी 14 टॉवर उभारण्यात येणार आहेत. या कामासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा चाळींच्या जागेवर 22 मजली 7 टॉवर उभारण्यात येणार असून 1582 घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.