डिज्नी 1 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एआयमध्ये मोठी गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची मोठी कपात करायला सुरुवात केली आहे. ओरॅकल कंपनीने जगभरातून 30 हजार आणि हिंदुस्थानातून 12 हजार कर्मचारी काढलेले असताना आता डिज्नी कंपनी 1 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. ही कर्मचारी कपात अवघ्या काही दिवसांत केली जाणार आहे, अशी माहिती वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका अहवालात दिली आहे.

डिज्नी गेल्या काही वर्षांपासून वाढती कॉस्ट आणि कमी नफ्यामुळे अडचणीत सापडली आहे. जोश डी अमारो यांनी नुकताच सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे, परंतु ही कर्मचारी कपात त्यांच्या आधीच कंपनीने ठरवलेली आहे. ज्या विभागात कमी नफा असेल ते विभाग कमी खर्चात चालवले जातील. या कर्मचारी कपातीचा थेट परिणाम मार्पेटिंग डिपार्टमेंटवर पडणार आहे.