
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या दरम्यान आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत उपरोधिक टिप्पणी केली आहे.
केजरीवाल यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, “सर्व संस्था आपल्या ताब्यात घेतल्यानंतर आणि लाखो मतदारांची नावे कमी केल्यानंतरही मोदी पश्चिम बंगाल निवडणुकीत हरले तर?” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सभी संस्थाओं पर क़ब्ज़ा करके लाखों वोट कटवाने के बाद भी अगर मोदी जी पश्चिम बंगाल का चुनाव हार गए तो?
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 11, 2026
पश्चिम बंगालमधील 294 सदस्यीय विधानसभा निवडणुका 23 आणि 29 एप्रिल रोजी दोन टप्प्यांत होणार असून मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे.
तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी अलीकडेच निवडणूक आयोग आणि भाजपवर मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळल्याचा आरोप केला. त्यांच्या मते, त्यांच्या पक्षाला पुन्हा सत्ता मिळाल्यास ही प्रक्रिया उलटवली जाईल. तसेच मतदार यादीतून वगळलेल्या लोकांच्या वर्गीकरणावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

























































