नितीश कुमार यांचे निवासस्थान बदलले; मुख्यमंत्रीपदाबाबत अद्याप सस्पेन्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे राजकीय निवासस्थान आता नवी दिल्ली असेल. नितीश कुमार यांनी बिहार विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथही घेतली आहे. मात्र, अद्याप त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसल्याने त्याबाबत सस्पेन्स कायम आहे.

नितीश कुमार यांनी अद्याप मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही. मात्र, त्यांनी मुख्यमंत्री निवासस्थान रिकामे करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानातील सामान आता ७ सर्क्युलर रोड येथे नेण्यात येत आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थान रिकामे करावे लागेल. मुख्यमंत्री निवासस्थानानंतर नितीश कुमार यांच्या निवासस्थानाची जागाही निश्चित झाली आहे.

नितीश कुमार यांचा नवीन पत्ता 1 अणे मार्ग ऐवजी ७ सर्क्युलर रोड असेल आणि त्यांच्या निवसास्थानातील सामान सीएम हाऊसमधून हलवले जात आहे. नितीश कुमार यांनी अद्याप बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही, परंतु त्यांच्या निसास्थानातील सामानाचे शिफ्टिंग करण्यात येत आहे. नितीश कुमार यांच्या राज्यसभा जागेच्या चर्चा सुरू होताच, हा बंगला त्यांचे पुढील निवासस्थान म्हणून निवडण्यात आला होता. हा बंगला नितीश कुमार यांचे निवासस्थान म्हणून तयार करण्यात आला आहे.