TMC जिंकल्यास मतदार यादीतून वगळलेली सर्व नावे पुन्हा जोडणार – अभिषेक बॅनर्जी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, तृणमूल काँग्रेसचे (TMC) सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला आहे. मतदार यादीतून लाखो नावे वगळण्यात आल्याचा आरोप करत, तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास ही सर्व नावे पुन्हा जोडली जातील, असे आश्वासन बॅनर्जी यांनी दिले आहे.

माध्यमांशी बोलताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, “मी खात्री देतो की जेव्हा TMC जिंकेल, तेव्हा मतदार यादीतून नाव कापल्या गेलेल्या प्रत्येकाचे नाव पुन्हा जोडले जाईल.

ते म्हणाले की, भाजप आणि निवडणूक आयोगाने सांगावे की, ज्या ९० लाख लोकांची नावे कापली गेली, ते सर्व बांगलादेशी होते का? त्यांच्याच विधानानुसार, यापैकी ६३ टक्के नावे हिंदूंची होती, मग ते देखील बांगलादेशी किंवा रोहिंग्या आहेत का?”

दरम्यान, पश्चिम बंगालमधील २९४ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा २३ एप्रिल रोजी, तर दुसरा टप्पा २९ एप्रिल रोजी पार पडेल. या निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहे.