Assam poll मतदानानंतर स्ट्राँगरूमच्या सुरक्षेत ‘गंभीर त्रुटी’; विरोधी पक्षनेते सैकिया यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
assam-polls-opposition-alleges-serious-security-lapses-in-evm-strongrooms

आसाम मध्ये ९ एप्रिल रोजी मतदान पार पडले. या नंतर EMV स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आले आहेत. मात्र या स्ट्राँगरूमच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवव्रत सैकिया यांनी केला आहे.

देवव्रत सैकिया यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून नाझीरासह अनेक मतदारसंघांच्या स्ट्राँगरूमच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी असून नियमांचे ‘उल्लंघन’ झाल्याचा आरोप केला आहे. सैकिया हे स्वतः नाझीरा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी अनुराग गोयल यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी दावा केला आहे की, मतदानानंतर निवडणूक EVM ची हाताळणी, मशीनचे स्टोरेज आणि सुरक्षा यांबाबत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे झालेले उल्लंघन हे ‘भयंकर आणि चिंताजनक’ असल्याचे म्हटले आहे.

आपण करत असलेल्या दाव्याच्या पुष्टीसाठी सैकिया यांनी पत्रासोबत ‘फोटो आणि व्हिडिओ पुरावे’ देखील सादर केले आहेत.

दरम्यान, आसाममध्ये 86.5 टक्के महिला मतदारांनी तर 85.3 टक्के पुरुष मतदारांनी यंदा मतदानाचा हक्क बजावला.

महिलांचा मतदानात विक्रम; आसाम, केरळ, पुदुच्चेरीत पुरुषांनाही मागे टाकले