
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स संघात झालेला सामना एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. या लढतीत हैदराबादचा नवखा गोलंदाज साकिब हुसैन याच्या गोलंदाजीवर शिवम दुबे बोल्ड झाला. दुबे बाद होण्यापूर्वी एका चाहत्याने मैदानावर लिंबू फिरवला होता असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईपुढे विजयासाठी 195 धावांचे आव्हान ठेवले होते. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत 17 व्या षटकात डावखुरा फलंदाज शिवम दुबे फलंदाजी, तर साकिब हुसैन गोलंदाजी करत होता. याचवेळी कॅमेरा स्टँडसमधील हैदराबादच्या एका चाहत्याकडे वळला. त्याच्या हातामध्ये एक लिंबू होता.
चाहत्याने लिंबू हवेमध्ये गरागरा फिरवला, काहीतरी पुटपुटला आणि विचित्र हातवारेही केले. त्यानतंर पुढच्याच चेंडूवर शिवम दुबे क्लीन बोल्ड झाला. या योगायोग पाहून सोशल मीडियावर मिम्सचा अक्षरश: पाऊस पडला आहे. IPL मध्ये तंत्रज्ञानासोबत आता तंत्र-मंत्रही आले का? असा मिश्किल प्रश्न चाहते विचारत आहेत. अर्थात ही केवळ अंधश्रद्धा असून याचे सर्व श्रेय हुसैनच्या गोलंदाजीला जाते हे स्पष्ट आहे.
SRH అభిమానిపై బీసీసీఐకి ఫిర్యాదు చేసిన CSK
నిన్న ఉప్పల్ స్టేడియంలో జరిగిన మ్యాచ్ లో నిమ్మకాయతో మంత్రాలు చదివిన SRH అభిమాని
తమ ఆటగాళ్లపై ప్రభావం చూపేలా ప్రేక్షకులు అనుసరించిన ఈ అతీంద్రియ పద్ధతులపై చర్యలు తీసుకోవాలని CSK డిమాండ్ https://t.co/Y6XobLo32h pic.twitter.com/UFqVs97s8L
— ChotaNews App (@ChotaNewsApp) April 19, 2026
चेन्नईची बीसीसीआयकडे तक्रार?
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापनाने या काळ्या जादूविरुद्ध बीसीसीआयकडे अधिकृत तक्रार केल्याचे लेटर व्हायरल झाले. हा अनफेअर प्लेचा प्रकार असल्याचे चेन्नईने लेटरमध्ये म्हटले. मात्र तपासाअंती चेन्नईकडून अशी कोणतीही तक्रार करण्यात आलेली नसून चाहत्यांनी मजेत किंवा खोडसाळपणाने तयार केलेली एक पोस्ट असल्याचे समोर आले. अर्थात ही तक्रार खोटी असली तरी 18 एप्रिल रोजी झालेल्या लढतीत लिंबू फिरवणारा चाहता सोशल मीडियावर रातोरात स्टार झाला आहे.
IPL 2026 – चेन्नईवरील थरारक विजय हैदराबादसाठी टर्निंग पॉईंट ठरणार; दिग्गज खेळाडूचं विधान
चेन्नईचा 10 धावांनी पराभव
साकिब हुसैन गोलंदाजीला आला तेव्हा चेन्नईची धावसंख्या 7 बाद 154 होती. त्यावेळी शिवम दुबे 21 धावांवर खेळत होता. साकिबने शिवमला एक फुल लेंथ चेंडू टाकला. दुबेला वाटले हा संथ गतीने टाकलेला चेंडू आहे, पण त्याचा अंदाज चुकला आणि पायाची कोणतीही हालचाल न झाल्याने चेंडू थेट स्ंटपवर आदळला. यानंतर चेन्नईचा डाव गडगडला आणि हैदराबादने अखेर हा सामना 10 धावांनी जिंकला. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे.


























































