तुमचे आशीर्वाद लाखमोलाचे, शरद पवार यांच्यासाठी सुनेत्रा पवारांची खास पोस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रकृती बिघडल्याने मतदानास जाणार नसल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी, तुमचे आशीर्वाद लाखमोलाचे अशी खास पोस्ट केली आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे आदरणीय पवार साहेब बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानास उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र त्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी आणि बारामतीकरांसाठी लाखमोलाचे आहेत. बारामतीसह महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासात आदरणीय साहेबांचे योगदान प्रेरणादायी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय दादांनीही विकासात्मक राजकारणाची समृद्ध परंपरा जपल्याचे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

आदरणीय साहेबांनी केलेल्या आवाहनाला बारामतीकर नक्कीच उत्स्फूर्त प्रतिसाद देतील. बारामतीची जनता विकासाच्या विचारांशी जोडलेली आहे आणि तीच दिशा पुढेही कायम राहील. आदरणीय साहेबांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी हीच मनःपूर्वक प्रार्थना, अशी पोस्ट सुनेत्रा पवार यांनी केली आहे.