
हिंदुस्थानी शेअर बाजारासाठी शुक्रवारचा दिवस ‘ब्लॅक फ्रायडे’ ठरला. शेअर बाजारात लागोपाठ तिसऱया दिवशी मोठी घसरण झाली. जागतिक स्तरांवर सुरू असलेला तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे बीएसई सेन्सेक्स आज दिवसअखेर 982 अंकांनी घसरून 76,681 अंकांवर बंद झाला, तर एनएसई निफ्टी 275 अंकांनी घसरून 23,897 अंकांवर बंद झाला. यामुळे अवघ्या एका दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल सहा लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
हिंदुस्थानी शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी आपल्या शेअर्सची मोठी विक्री केली. आयटी शिवाय फार्मा आणि मीडिया सेक्टरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली, तर मेटल सेक्टरमध्ये थोडी मजबुती पाहायला मिळाली. मिडपॅप आणि स्मॉलपॅप इंडेक्समध्ये जवळपास एक टक्का घसरण झाली. निफ्टीमधील आयटी इंडेक्स पाच टक्क्यांपर्यंत घसरला. इन्पहसिस, टीसीएस आणि टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. बाजारात झालेल्या घसरणीमागे सर्वात मोठे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती 107 डॉलर प्रति बॅरलवर विकल्या जात आहेत.

























































