निदा खानचा अंतरिम जामीन कोर्टाने फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीसीएस बीपीओ कार्यालयातील लैंगिक छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणातील आरोपी निदा खान हिचा अटकपूर्वक जामीन अर्ज नाशिक सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. याआधी न्यायालयाने तिला कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. या निर्णयाविरोधात निदा खानचे वकील मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे. निदाच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, ती गर्भवती असून तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे.