
मध्य रेल्वे प्रशासनाने आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी शनिवारी 13 तासांचा विशेष ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉक काळात आसनगाव ते कसारा स्थानकांदरम्यानची लोकल आणि मेल-एक्स्प्रेसची वाहतूक दुपारी 2 वाजल्यापासून मध्यरात्री 3 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद असणार आहे. ब्लॉकमुळे अनेक मेल-एक्स्प्रेस रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. आसनगाव आणि तानशेत स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर विशेष ट्राफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे आसनगाव ते कसारा स्थानकांदरम्यानची रेल्वे वाहतूक बंद राहणार असल्याने प्रवाशांना थेट सीएसएमटी ते कसारा लोकल सेवा उपलब्ध नसेल.



























































