पांढरा, तपकिरी की लाल तांदूळ? कोणता तांदूळ आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे? जाणून घ्या…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रत्येक हिंदुस्थानी घरात भाताशिवाय दुपारचे किंवा रात्रीचे जेवण अपूर्ण असते. आणि आपण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या जेवणात भाताचा समावेश करतोच. पण जेव्हा आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा पांढरा, तपकिरी किंवा लाल तांदूळ यापैकी कोणता पर्याय निवडावा? याबद्दल अनेकदा प्रश्न पडतो.

तिन्ही प्रकारच्या तांदळाची स्वतःची अशी वेगळी वैशिष्ट्ये आणि पौष्टिक मूल्ये आहेत. पांढरा तांदूळ शुद्ध केलेला आणि प्रक्रिया केलेला असतो. ज्यामध्ये त्याचा बाहेरील थर पूर्णपणे काढून टाकला जातो. यामुळे तांदळात फक्त स्टार्चचा भाग शिल्लक राहतो आणि याउलट, ब्राऊन राईसमध्ये फक्त बाहेरील साल काढली जाते. त्यामुळे त्यातील पोषक तत्वे आणि फायबर अबाधित राहतात. त्याचप्रमाणे, लाल तांदळातही त्याचा बाहेरील थर राहतो त्यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असते.

पांढऱ्या तांदळात फायबरचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. त्यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी लगेच वाढते. त्यामुळे राजमा-भात किंवा बिर्याणी खाल्ल्यानंतर आपल्याला अनेकदा सुस्ती येते. तपकिरी आणि लाल तांदूळ हे हळूहळू ऊर्जा देणारे पदार्थ आहेत. ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात. 100 ग्रॅम शिजवलेल्या पांढऱ्या तांदळात अंदाजे 130 कॅलरीज असतात, तर तपकिरी आणि लाल तांदळात अंदाजे 110 कॅलरीज असतात.

पोषक तत्वांच्या बाबतीत कोणता तांदूळ सर्वोत्तम आहे?

पांढरा, तपकिरी आणि लाल तांदूळचे हे तिन्ही प्रकार मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोहाने समृद्ध आहेत. लाल तांदळात असलेले अँटिऑक्सिडंट अँथोसायनिन्स त्याला त्याचा विशिष्ट लाल रंग देतात. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि मदत होऊ शकते. तसेच लाल तांदळातील घटक वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. तथापि, पांढरा तांदूळही पूर्णपणे वाईट नाही आणि तो पचायला सर्वाधिक सोपा असतो.

कोणता तांदूळ आरोग्यासाठी उपयुक्त ?

तुम्हाला जर मधुमेह किंवा इन्सुलिन प्रतिरोध नसेल आणि तुम्ही सहज पचणारा आहार पसंत करत असाल तर तुम्ही पांढरा भात खाऊ शकता. तथापि, तुम्हाला अधिक फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असलेला भात खायचा असेल तर तपकिरी किंवा लाल भात हे उत्तम पर्याय आहेत. तुम्ही घरी फक्त पांढरा भात बनवत असाल तर, तुमच्या आहारात संतुलन राखण्यासाठी फायबरयुक्त भाज्या आणि डाळींचे प्रमाण वाढवले पाहिजे.