हे करून पहा – फ्रीजमधून पाणी बाहेर येतंय…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेफ्रिजरेटर किंवा फ्रीजमधून पाणी बाहेर येण्याचे मुख्य कारण म्हणजे आतील पाण्याचा निचरा होणारे ड्रेनेज होल बंद होणे किंवा ड्रेन ट्रे भरणे होय. फ्रीजच्या अगदी खाली (तळाशी) एक ट्रे असतो. तो ट्रे बाहेर काढून रिकामा करा आणि पुसून करा.

फ्रीजचे रबर सैल असेल किंवा दरवाजा खूप वेळ उघडा राहिला तर गरम हवा आत जाते. यामुळे अतिरिक्त बर्फ तयार होतो आणि पाणीगळती सुरू होते. जर फ्रीज तिरका असेल तर पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही.