नागरिकत्व शुल्कात 75 टक्के वाढ, अमेरिकेत राहणाऱ्या हिंदुस्थानींना मोठा धक्का, ट्रम्प सरकारचा नवा प्रस्ताव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणे आता महाग होणार आहे. ट्रम्प प्रशासनाने अमेरिकी नागरिकत्वासाठीच्या अर्ज शुल्कात जवळपास 75 टक्क्यांपर्यंत भरीव वाढ प्रस्तावित केली आहे. याशिवाय कमी उत्पन्न असलेल्या अर्जदारांसाठी असलेली शुल्कमाफी आणि सवलतीदेखील पूर्णपणे रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाच्या या निर्णयाचा हिंदुस्थानी वंशाच्या ग्रीनकार्डधारकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

यू.एस. सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसने जारी केलेल्या प्रस्तावित नियमानुसार, फॉर्म एन -400 साठीचे शुल्क कागदी अर्जासाठी 760 डॉलरवरून 1330 डॉलरपर्यंत आणि ऑनलाइन अर्जासाठी 710 डॉलर वरून 1280 डॉलरपर्यंत वाढणार आहे. याव्यतिरिक्त, नागरिकत्व नाकारण्याच्या निर्णयाच्या पुनरावलोकनासाठी दाखल केल्या जाणाऱया फॉर्म एन-336 चे शुल्क 830 डॉलरवरून 1475 डॉलरपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे, ही जवळपास 78 टक्के वाढ आहे.

शुल्कमाफी रद्द

या प्रस्तावानुसार, ज्या अर्जदारांचे काwटुंबिक उत्पन्न कमी आहे, त्यांच्यासाठी असलेली शुल्कमाफी रद्द केली जाईल. सध्या उपलब्ध असलेले सवलतीच्या शुल्काचे पर्यायही रद्द केले जातील. अमेरिकी लष्कराच्या सदस्यांना ही सवलत मिळत राहील.

नवीन नियम कधी लागू होईल?

नवीन नियम अद्याप लागू करण्यात आलेला नाही. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने त्यावर अभिप्राय मागवले आहेत. येत्या 60 दिवसांत प्रस्तावित केलेला नवीन नियम अद्याप लागू करण्यात आलेला नाही. नागरिक आणि संस्था आपली मते, सूचना किंवा आक्षेप सादर करू शकतील. सर्व अभिप्रायांवर विचार करून त्यांना अंतिम रूप दिल्यानंतरच अंतिम नियम लागू केला जाईल. प्रस्तावित नियम लागू होईपर्यंत, सध्याची प्रणाली सुरू राहील. उत्पन्न, आर्थिक अडचण किंवा सार्वजनिक मदतीवर आधारित शुल्कमाफी आणि 380 डॉलरचे सवलतीचे शुल्क कायम राहील.