तहसीलदाराकडे सापडली साडेपाच कोटींची संपत्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हैदराबादमध्ये एका तहसीलदाराच्या घरात तब्बल 5.5 कोटींची संपत्ती सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एसीबीने केलेल्या छाप्यात महिला तहसीलदाराकडे 3 फ्लॅट, 2 प्लॉट, 1.2 कोटी रुपयांचे दागिने आणि 12 लाखांची रोकड मिळाली आहे.

थुम्माकोम्मा सुचरिता असे या तहसीलदाराचे नाव आहे. या तहसीलदाराला 30 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. तपास केला असता सिद्दीपेटमध्ये 2.17 एकर जमीन, हैदराबादमध्ये 3 फ्लॅट, 2 प्लॉट, एक फॉक्सवेगन कार, एक ह्युंदाई व्रेटा कार, 1.2 कोटी रुपयांचे सोने आणि 12 लाख रुपयांची रोकड, तसेच बँक खात्यात 38 लाख रुपये असल्याचे दिसून आले. महिलेने नोकरीदरम्यान मिळकतीपेक्षा जास्त संपत्ती जमवली आहे.