
परभणीमध्ये झालेली गद्दारी फोडून काढण्यासाठी, परभणीवासियांच्या मनात असलेल्या असंतोषाचं प्रतीक म्हणून दिलेला आसूड घेऊन आता प्रत्येकाने सज्ज व्हायला हवं! हा निर्धार करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित निष्ठावंतांसोबत संवाद साधला. या शिवसैनिक मेळाव्यास उसळलेली तुफान गर्दी साक्ष देत होती की फितुरीला आम्ही नक्की गाडून टाकणार. परभणीचा बालेकिल्ला मजबुतीने उभा करणार!
या कार्यकर्ता मेळाव्यास युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार राहुल पाटील, परभणीचे महापौर सय्यद इकबाल, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, शिवसेना सचिव, स्वीकृत नगरसेवक साईनाथ दुर्गे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.


































































