टीईटी पेपर फुटीप्रकरणी दोघांना कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भिवंडीतील टीईटी पेपर फुटी प्रकरणातील दोघा आरोपींना शनिवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली. कपिल दहिया आणि संजयकुमार शर्मा अशी त्यांची नावे आहेत. टीईटी पेपर फुटीप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या १२ झाली आहे.

कपिल दहिया आणि संजयकुमार शर्मा यांना अटक केल्यानंतर ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. ती शनिवारी संपल्याने या दोघांना भिवंडी न्यायालयात हजर केले. सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी ठोठावली. या गुन्ह्यात एकूण १२ जण आतापर्यंत अटक असून पैकी यापूर्वी ८ जणांना तपासानंतर न्यायालयीन कोठडी ठोठावली. यातील आणखी दोघांना न्यायालयीन कोठडी ठोठावली. त्यामुळे आता पोलीस कोठडीत दोन आरोपी राहिले आहेत.