
रेल्वेच्या एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेतील तब्बल 1.27 कोटी रुपयांचे साहित्य चोरले आहे. ही चोरी चार वर्षांत केली असून चोरीच्या साहित्यांमध्ये बेडशीट, ब्लँकेट, उशा आणि टॉवेलचा समावेश आहे. 1 हजार प्रवाशांमधील 1 प्रवाशी रेल्वेतील साहित्य चोरून घेऊन गेल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.
माहिती अधिकारा अंतर्गत रेल्वेच्या 69 विभागांमध्ये अर्ज केले. यामध्ये 54 विभागांमधून 18पैकी 16 बाबतींत माहिती मिळाली. जानेवारी 2022 ते मे 2026पर्यंत 1 कोटी 27 लाख रुपयांचे साहित्य प्रवाशांनी चोरल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 2022 ते 2025पर्यंत या चोऱ्यांमध्ये 56 टक्के वाढ झाली आहे. आरटीआयच्या माहितीनुसार या चोऱ्यांमुळे कंत्राटदाराला 104.51 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून या नुकसानाची भरपाई कंत्राटदाराने नेमलेल्या त्या डब्ब्यांमधील कराचाऱ्याच्या वेतनातून केली जाते. माहिती अधिकारा अंतर्गत आलेल्या बिकानेर, रांची येथे सर्वाधिक चोऱ्यांची नोंद केली गेली. त्याशिवाय बिकानेर विभागातून 25.76 लाख वस्तू, रांचीतून 9.31 लाख आणि दिल्लीतून 8.21 लाख वस्तू चोरीला गेल्याची नोंद आहे. बिकानेरमध्ये सर्वाधिक 12.42 लाख बेडशीट्स चोरीला गेले आहेत. या कालावधीत त्या विभागात चोरीला गेलेल्या एकूण वस्तूंमध्ये जवळपास निम्मे बेडशिट्स आहेत. या चोरीमुळे कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे.
सर्वाधिक चोरी टॉवेल्सची!
चार वर्षांत 46.54 लाख टॉवेल चोरीला गेलेत. त्यानंतर 41.13 लाख बेडशीट, 23.59 लाख उश्यांचे कव्हर, 12.95 लाख ब्लँकेट्स आणि 2.76 लाख उश्या अशी चोरीला गेलेल्या वस्तूंची यादी आहे.
मुंबईसह 7 विभागांत सर्वाधिक चोऱ्या
10 पैकी 7 विभागांत चोऱ्यांमध्ये मुंबई, बिकानेर, जोधपूर, जयपूर, रांची, दिल्ली, सोनापूर, दानापूर, अहमदाबाद, बिलासपूरचा समावेश आहे.
- टॉवेल्स – 46.53 लाख
- बेडशीट्स – 41.13 लाख
- उशा कव्हर – 23.59 लाख
- ब्लँकेट्स – 12.95 लाख
- उशा – 2.76 लाख
- दिल्ली टॉवेल 4.78 लाख रुपये
- रांची टॉवेल 3 लाख 88 हजार
- मुंबई टॉवेल 3 लाख 57 हजार
- दानापूर टॉवेल 3 लाख 37 हजार
- अहमदाबाद टॉवेल 3 लाख 22 हजार
- जयपूर टॉवेल 2 लाख 52 हजार
- सोनापूर उशांचे कव्हर 1 लाख 58 हजार
- बिलासपूर ब्लॅँकेट्स 3.4 लाख रुपये
चार वर्षांतील चोरी
2022 24.83 लाख
2023 29.67 लाख
2024 31.31 लाख
2025 38.81 लाख
2026 2.31 लाख
एकूण 1.27 कोटी





























































