ठाण्यातील कार्यालय अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात, सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी मागितले सव्वा लाख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी तब्बल सव्वा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी उपनिबंधक कार्यालयाचे अधीक्षक सुधाकर राठोड यांना एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. राठोड यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

ठाण्याच्या युनिटी इंडस्ट्रियल पार्क ओ प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेची नोंदणी करण्यात येणार होती. नोंदणी करून देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या ठाणे कार्यालयातील कार्यालय अधीक्षक सुधाकर राठोड यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी एक लाख रुपये आणि स्वतःसाठी २५ हजार रुपये, अशी एकूण १ लाख २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदारांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.