
एका शिक्षकाने आपल्या दोन मुलांसह गोदावरी नदीवरील पुलावरून भरधाव कार झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनील नारायण मोरे असे या शिक्षकाचे नाव आहे. ते नांदेड शहरातील अंबानगर परिसरात वास्तव्यास होते. ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. सुनील मोरे यांनी आपल्या लॅपटॉपमध्ये एक सविस्तर नोट लिहून ठेवल्याची माहिती आहे.






























































