उद्याची शेती – चांदवडची शिदोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रितेश पोपळघट
[email protected]

सामाजिक सक्षमीकरणाची पहिली पायरी महिलांना शेतकरी ही ओळख देण्याबरोबरच त्यांना सर्वंकषरित्या सक्षम करण्याची गरज ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांनी मांडली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी महिला आघाडी, चांदवड महिला अधिवेशन, लक्ष्मी मुक्ती अभियान आणि महिला शेतकऱयांच्या स्वाभिमानाच्या आंदोलनांनी या परिवर्तनाची पायाभरणी केली. महिला शेतकऱयांचा हा अनेक दशकांचा संघर्ष आज महिला शेतकरी विधेयकाच्या माध्यमातून आकारास आला आहे.

महिलांना शेतकरी ही ओळख देण्याबरोबरच त्यांना सर्वंकषरित्या सक्षम करण्याची गरज ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांनी मांडली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी महिला आघाडी, चांदवड महिला अधिवेशन, लक्ष्मी मुक्ती अभियान आणि महिला शेतकऱयांच्या स्वाभिमानाच्या आंदोलनांनी या परिवर्तनाची पायाभरणी केली. महिला शेतकऱयांचा हा अनेक दशकांचा संघर्ष आज महिला शेतकरी विधेयकाच्या माध्यमातून आकारास आला आहे.

जुलै 2026 मध्ये महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेले ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, 2026’ हे राज्याच्या कृषी इतिहासातील एक ऐतिहासिक पाऊल मानले जाईल. आजवर शेतीत दिवस-रात्र श्रम करणाऱया लाखो महिलांना केवळ जमिनीच्या सातबाऱयावर नाव नसल्यामुळे ‘शेतकरी’ म्हणून कायदेशीर मान्यता मिळत नव्हती. त्या शेतीतील प्रत्येक काम करत होत्या; परंतु सरकारी कागदोपत्री त्यांची ओळख केवळ ‘शेतकऱयाची पत्नी’ किंवा ‘कुटुंबातील सदस्य’ इतकीच मर्यादित होती. या नव्या विधेयकामुळे जमिनीची मालकी नसली तरी प्रत्यक्ष शेती करणाऱया महिलांना कायदेशीर ‘शेतकरी’ म्हणून मान्यता मिळणार आहे. परिणामी कृषी कर्ज, पीक विमा, अनुदान, शासकीय योजना, प्रशिक्षण, बाजारपेठ आणि इतर कृषी सेवांचा थेट लाभ त्यांना मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.

महिला शेतकरी विधेयक आज अस्तित्वात आले असले, तरी त्यामागे अनेक दशकांचा महिला शेतकरी चळवळीचा संघर्ष आहे. विशेषत शेतकरी नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या शेतकरी महिला आघाडी, चांदवड महिला अधिवेशन, लक्ष्मी मुक्ती अभियान आणि महिला शेतकऱयांच्या स्वाभिमानाच्या आंदोलनांनी या परिवर्तनाची पायाभरणी केली. ‘चांदवडची शिदोरी’ या पुस्तकात महिला शेतकऱयांच्या प्रश्नांचा, त्यांच्या श्रमांचा आणि त्यांच्या हक्कांच्या लढय़ाचा अत्यंत प्रभावी आढावा घेतला आहे.

शरद जोशी यांनी एक अत्यंत मूलभूत प्रश्न उपस्थित केला होता ‘शेतकरी म्हणजे कोण?’ त्यांच्या मते, जो व्यक्ती शेतात श्रम करतो, पेरणीपासून कार्यंत सर्व कामे करतो, त्यालाच शेतकरी म्हणायला हवे. महिलाही पुरुषांइतक्याच, किंबहुना अनेकदा त्याहून अधिक वेळ शेतीत काम करतात. पेरणी, निंदणी, खुरपणी, तणनियंत्रण, खत व्यवस्थापन, कानिवड, वर्गीकरण, पशुपालन, बियाणे साठवण तसेच घर आणि शेत यांचा दुहेरी भार त्या सांभाळतात. तरीही त्यांना ‘शेतकरी’ ही ओळख नाकारली जात होती. या पुस्तकात महिला शेतकऱयांच्या दैनंदिन जीवनाचे वास्तवही प्रभावीपणे मांडले आहे. पहाटेपासून रात्रीपर्यंत घरकाम, जनावरांची देखभाल, पाणी भरणे, स्वयंपाक, त्यानंतर दिवसभर शेतीतील सर्व कामे आणि पुन्हा घरी परतल्यावर घराची जबाबदारी असा तिचा अखंड दिवस असतो. तिच्या श्रमांना ना आर्थिक मूल्य मिळते, ना सामाजिक सन्मान.

1986 मधील ऐतिहासिक चांदवड महिला अधिवेशन हा या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. या अधिवेशनाने ग्रामीण महिलांना प्रथमच त्यांच्या प्रश्नांची जाणीव करून दिली. महिलांच्या समस्या केवळ आर्थिक नसून सामाजिक, कौटुंबिक आणि मालकी हक्कांशीही निगडित आहेत, हा विचार या चळवळीने समाजासमोर मांडला. स्त्राr-पुरुष संघर्ष नव्हे, तर समान सहभाग आणि समान सन्मान हा या चळवळीचा केंद्रबिंदू होता. महिलेला घरात आणि शेतीत समान स्थान मिळाले पाहिजे, हा संदेश चांदवडच्या अधिवेशनाने महाराष्ट्राला दिला.

या चळवळीचा पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘लक्ष्मी मुक्ती’ अभियान. या अभियानाचा मुख्य उद्देश महिलांच्या नावावर जमीन नोंदविण्यासाठी समाजात जनजागृती करणे हा होता. लाखो महिलांच्या नावाने जमीन नोंदविण्यासाठी अर्ज करण्यात आले आणि महिलांच्या मालकी हक्काचा प्रश्न राज्याच्या राजकीय अजेंडय़ावर आला. ‘चांदवडची शिदोरी’मध्ये या अभियानामुळे महिलांच्या नावावर जमीन नोंदविण्याची मोठी चळवळ उभी राहिल्याचा उल्लेख आहे.

मागील वर्षी महाराष्ट्र सरकारने महिलांच्या शेतीमालमत्तेवरील हक्कांसाठी ‘लक्ष्मी मुक्ती योजना’ सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना शेतीमालमत्तेवर समान हक्क देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे हा आहे. जुलै 2026 मधील हे विधेयक त्या संघर्षाचे आधुनिक रूप आहे. या कायद्यामुळे जमिनीची मालकी नसलेल्या, पण प्रत्यक्ष शेती करणाऱया महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून मान्यता मिळणार आहे. आर्थिक निर्णयक्षमता ही सामाजिक सक्षमीकरणाची पहिली पायरी असते. याचे अनेक सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत. सर्वप्रथम, महिलांना आता कृषी विभागाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळेल. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण, सिंचन, बियाणे, कृषी प्रशिक्षण, शेतीपूरक व्यवसाय, स्वयंरोजगार, शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्यत्व, बाजारपेठेतील संधी आणि विविध अनुदानांचा समावेश होतो. यापूर्वी या अनेक योजनांसाठी जमिनीची मालकी आवश्यक असल्याने महिलांना त्यांचा प्रत्यक्ष लाभ मिळत नव्हता.

दुसरे म्हणजे, पीक विमा आणि कृषी कर्ज उपलब्ध होण्याचा मार्ग खुला होईल. अनेक महिलांनी शेतीची जबाबदारी प्रत्यक्ष सांभाळूनही त्यांना बँकांकडून कर्ज मिळत नव्हते. आता त्यांची स्वतंत्र शेतकरी म्हणून नोंद झाल्यानंतर आर्थिक संस्थांकडून त्यांच्याकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहिले जाईल. तिसरे म्हणजे, या कायद्यामुळे महिलांचा निर्णयप्रक्रियेत सहभाग वाकोणते पीक घ्यायचे, कोणते तंत्रज्ञान वापरायचे, कोणती गुंतवणूक करायची किंवा कोणत्या बाजारात विक्री करायची, यामध्ये महिलांची भूमिका अधिक मजबूत होईल. चौथे, महिला शेतकऱयांच्या ओळखीचा प्रश्न सुटेल. अनेक वर्षे महिलांनी शेतीत श्रम केले, पण त्यांच्या कामाची अधिकृत नोंद नव्हती. आता शासनाच्या नोंदींमध्ये त्यांची स्वतंत्र शेतकरी म्हणून नोंद होणे, हा त्यांच्या सन्मानाचा विषय आहे.

तथापि, या विधेयकाचे यश केवळ कायदा मंजूर झाल्याने निश्चित होणार नाही. त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे तितकेच आवश्यक आहे. प्रत्येक गावात महिला शेतकऱयांची नोंदणी, त्यांच्यासाठी स्वतंत्र ओळखपत्र, डिजिटल नोंदी, ग्रामपंचायत आणि कृषी विभागातील समन्वय, बँकिंग प्रक्रियेत सुलभता तसेच अधिकारी वर्गाचे संवेदनशील प्रशिक्षण यांशिवाय या कायद्याचा अपेक्षित परिणाम साध्य होणार नाही.

‘चांदवडची शिदोरी’मध्ये मांडलेला विचार आजही तितकाच महत्त्वाचा वाटतो. महिलांच्या प्रश्नांचे उत्तर केवळ आर्थिक मदतीत नाही; तर त्यांना समान सामाजिक स्थान, निर्णयक्षमता आणि स्वाभिमान मिळण्यात आहे. महिला आणि पुरुष हे परस्परपूरक आहेत आणि शेतीच्या विकासासाठी दोघांचाही समान सहभाग आवश्यक आहे. आता पुढचे आव्हान म्हणजे या कायद्याला प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचविणे. महिला शेतकऱयाला तिचे हक्क, तिची ओळख आणि श्रमांचा सन्मान मिळाला, तरच या विधेयकाचे खरे यश ठरेल.
(लेखक शेती क्षेत्रात कार्यरत असून ‘द फार्म’ या स्टार्टअपचे सहसंस्थापक आहेत.)