गुजरातच्या नवसारीत महापूर; सात शहरांना पाण्याचा वेढा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नवसारीत महापूर आला असून अहमदाबाद, सुरतसह पाच शहरांत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. वलसाड, तापीतील अनेक भागांत पाणी साचले असून तापी जिह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांनी मदतकार्य सुरू केले आहे.

गुजरात राज्यात जवळपास 1200 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. तसेच हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. वलसाडच्या उमरगावमध्ये 16 तासांत 1100 मिमी पाऊस पडला आहे. वलसाड जिह्यात 35 प्रवाशांची बस सुरतहून महाराष्ट्राकडे जात असताना पाण्यात अडकली. या सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. वलसाडमध्ये पार्ंकगमध्ये असलेल्या 50 कार पाण्यात बुडाल्या. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुजरातमधील पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतील. दक्षिण गुजरातमधील 11 जिह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये दाहोद, पंचमहाल, वडोदरा, छोटा उदेपूर, भरूच, नर्मदा, सुरत, तापी, डांग, नवसारी आणि वलसाड या जिह्यांचा समावेश आहे.