
पत्रकारिता क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणऱ्या ‘मुंबई प्रेस क्लब’च्या द्विवार्षिक निवडणुकीत ज्येष्ठ पत्रकार सुरेंद्र गांगण यांच्या नेतृत्वाखालील ‘सेव्ह प्रेस क्लब अलायन्स’ने एकतर्फी बाजी मारली आहे. ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांच्या नेतृत्वाखालील प्रोग्रेसिव्ह डेमॉक्रॅटिक पॅनलचा पराभव झाला. क्लबच्या अध्यक्षपदी सुरेंद्र गांगण यांची निवड झाली.
आरोप-प्रत्यारोपांमुळे गाजलेली मुंबई प्रेस क्लबची निवडणूक शुक्रवारी पार पडली. या निवडणुकीत एकूण 862 जणांनी मतदान केले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुरेंद्र गांगण यांना एकूण 582 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी राजीव खांडेकर यांना 260 मते मिळाली. ‘सेव्ह प्रेस क्लब अलायन्स’चे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले.
नवी कार्यकारिणी
चेअरमन – एस. बालपृष्णन, व्हाइस चेअरमन – धोंडिबा म्हस्के, सचिव – अनिल कुमार सिंह, सहसचिव – सुधाकर कश्यप, खजिनदार – ओमप्रकाश तिवारी.
व्यवस्थापकीय समिती
वैभव परब, स्वप्नील शिंदे, पूनम अपराज, मनीषा रेगे, अनिता शुक्ला, शाहिद अन्सारी, आदित्य दुबे, मधू नैनान, बेनीचन के. जे., उमेश गोस्वामी.

























































