महापालिकेची ‘ड्रग फ्री मुंबई’ मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तरुणाईला व्यसनमुक्त करण्यासाठी मुंबईमध्ये पालिकेच्या वतीने ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियान राबवले जाणार आहे. शाळा-कॉलेजच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यास सुरुवात होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 30 जुलै रोजी वरळीमध्ये या उपक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे.

तरुणाईच्या व्यसनमुक्तीसाठी पालक-शिक्षक संघटना, सार्वजनिक आरोग्य यंत्रणा, आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स, स्वयंसेवी संस्था यांसारख्या संबंधित घटकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.