
अयोध्येच्या राम मंदिरातील चोरीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रतीकात्मक नाट्य सादर करणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अन्य दोन खासदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनातन धर्माचा अपमान केल्याचा वा धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
राम मंदिरात देणगी चोरी कशी झाली हे दाखवण्यासाठी अपक्ष खासदार पप्पू यादव, समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांनी शुक्रवारी संसद भवनाच्या आवारात एक विडंबन नाट्य सादर केले होते. राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदारांनी त्यात सहभाग घेतला. या नाट्यात पप्पू यादव हे भगवे वेषातील पुजारी बनले होते. हे पुजारीच देणगी चोरत असल्याचे त्यात दाखवण्यात आले होते. या पथनाट्याला आक्षेप घेत काही साधूनी वाराणसीच्या कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
























































