हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात हिंदुस्थानच्या रणरागिणी सज्ज! Asia Cup 2026 साठी BCCI ने केली संघाची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

BCCI ने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात Asia Cup 2026 साठी हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. तंदुरुस्तीच्या कारणास्तव आणि दुखापतीमुळे श्रेयांका पाटिलला संघात स्थान मिळालेले नाही, तिच्या जागी लेग स्पिन ऑलराउंडर प्रेमा रावतवर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला आहे.

आशिया चषकाचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, ही स्पर्धा ऑगस्टच्या अखेरीस ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत खेळवली जाण्याची शक्यता आहे. या स्पर्धेच्या लगेचच, 17 ते 22 सप्टेंबर दरम्यान जपानमध्ये एशियन गेम्सचे आयोजन केले जाणार आहे. दरम्यान, टीम इंडियाची उप-कर्णधार स्मृती मनधाना, जेमिमा रोड्रिग्स, दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष या चार स्टार खेळाडू सध्या इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ लीगमध्ये सहभागी होत आहेत.

एशिया कप 2026 साठी भारतीय महिला संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप-कर्णधार), शैफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, भारती फुलमाली, ऋचा घोष (यष्टिरक्षक), जी. कमलिनी (यष्टिरक्षक), दीप्ती शर्मा, राधा यादव, प्रेमा रावत, अरुंधति रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंह, एन. श्री चरणी आणि नंदनी शर्मा.

राखीव खेळाडू : प्रतीका रावल, उमा छेत्री (यष्टिरक्षक), वैष्णवी शर्मा, सयाली सतघरे आणि मिन्नू मणि.