
श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणावरून संसदेच्या परिसरात पथनाटय़ करून मोदी सरकारचा निषेध करणारे अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्यावर दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत एका व्यक्तीने चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीने पप्पू यादव यांच्यावर चप्पल फेकून मारली. त्यामुळे गोंधळ झाला. यादव यांच्या समर्थकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सुमित असे या आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील आहे.


























































