तरुणाची 21 लाखांची फसवणूकप्रकरणी एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टास्कच्या नावाखाली तरुणाची 21 लाखांची फसवणूकप्रकरणी एकाला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. साद सोहेल चव्हाण असे त्याचे नाव आहे.

तक्रारदार तरुण हा मालाड येथे राहतो. जून महिन्यात त्याला यूटय़ूबवरील व्हिडीओ लाईक करण्याचे टास्कबाबत पार्टटाइम नोकरीची ऑफर देण्यात आली. टास्कचे काम असल्याने तक्रारदार याने होकार दिला. होकार दिल्यानंतर त्याला वेगवेगळे चित्रपट आणि रेसिपीचे टास्क देण्यात आले. टास्क दिल्यावर त्याला बँक खात्यात कमिशनची रक्कम जमा होत होती. तक्रारदाराने बँक खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला पैसे काढता येत नव्हते. तक्रारदार तरुणाने त्याबाबत विचारणा केली तेव्हा त्याला खाते अपडेटचा सल्ला दिला गेला. त्याचे खाते गोठवले आहे असे सांगून अधिक पैशाची मागणी केली. त्यावर विश्वास ठेवून त्याने 9 लाख 65 हजार रुपये ट्रान्स्फर केले. पैसे ट्रान्स्फर केल्यावर त्याच्याकडे आणखी पैशाची मागणी केली गेली. त्याने टास्कच्या नावाखाली 21 लाख 16 हजार रुपये विविध बँक खात्यांत ट्रान्स्फर केले होते. पैसे दिल्यावर त्यांना ठगाने प्रतिसाद देणे बंद केले. ही बाब लक्षात येताच त्यांनी उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.