
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री योगिता चव्हाण सध्या आपल्या अभिनयासोबतच स्टायलिश लूकने प्रेक्षकांना भुरळ घालत असते. नुकतेच योगिताने केलेले एक नवीन फोटोशूट सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या फोटोमध्ये योगिताने लॅव्हेंडर आणि सॉफ्ट न्यूड-टोनचा आकर्षक बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. ड्रेसची मिनिमल स्टाइल आणि त्याला दिलेली नाजूक ज्वेलरीची जोड या संपूर्ण लूकला एक सोबर, एलिगंट टच देत आहे. योगिताच्या या सोबर अवतारावर चाहते फिदा झाले असून तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.


























































