
स्टेट बँक ऑफ इंडियाने लिपिक (ज्युनियर असोसिएट) पदांसाठी विशेष भरती मोहीम 2026 ची अधिसूचना जारी केली आहे. याअंतर्गत एकूण 1538 पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील बॅकलॉग जागा भरण्यासाठी काढण्यात आल्या आहेत आणि ज्युनियर असोसिएट (ग्राहक सहाय्य आणि विक्री) या पदावर केल्या जातील. भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइट recruitment.Wi.bank.in वर देण्यात आली आहे. उमेदवाराकडे पदवी असणे आवश्यक असून उमेदवार हा 21 ते 28 वर्षांपर्यंत असायला हवा. ओबीसीला 3 तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवाराला 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवाराला 24,050 – 64,480 रुपये प्रति महिना पगार मिळेल.



























































