बाप्पाच्या दर्शनासाठी प्रियांका सिद्धिविनायक मंदिरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या ‘वाराणसी’ चित्रपटामध्ये प्रियांका चोप्रा व दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांची जोडी झकळणार आहे. सिनेमाच्या शूटिंगसाठी हिंदुस्थानात  आलेल्या प्रियांका चोप्राने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन लाडक्या बाप्पाचे दर्शन घेतले.

मुंबईतील प्रसिद्ध प्रभादेवी परिसरातील सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये प्रियांकाने गणपती बाप्पाचे दर्शन घेतले असून मंदिराच्या आवारातील प्रियांकाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. प्रियांका चोप्राने भक्तिभावाने गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर ती मंदिरातून बाहेर पडताना दिसली. यावेळी तिने पायांत कोणतीही चप्पल किंवा पादत्राणे घातलेली नव्हती. मंदिराबाहेर आल्यानंतर प्रियांकाने पापाराझींना हसून नमस्कार केला.