
या वर्षातील दुसरे आणि अखेरचे सूर्यग्रहण हे उद्या, 12 ऑगस्ट रोजी दिसणार आहे. यामुळे जगातील अनेक भागात दिवसाच अंधार होईल. परंतु, हे सूर्यग्रहण हिंदुस्थानात दिसणार नाही. ज्यावेळी हे ग्रहण सुरू होईल, त्यावेळी हिंदुस्थानात रात्र असेल. हे ग्रहण मुख्य ग्रीनलँड आणि आइसलँड यासोबतच स्पेनमध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच एक सूर्यग्रहण झाले पण ते देखील हिंदुस्थानात दिसले नव्हते.































































