
रायगड जिल्ह्यात एचआयव्हीचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या आढावा सभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत ६१ हजार ८३३ जणांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये १०३ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. विशेष म्हणजे बाधित व्यक्तींमध्ये ८ गर्भवती मातांचाही समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्याला एचआयव्हीचा विळखा पडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
१ एप्रिल ते जुलै २०२६ दरम्यान जिल्ह्यात ६१ हजार ८३३ जणांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली, यामधील १०३ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये ८ गर्भवती माता एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आल्या. संसर्गापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी त्वरित समुपदेशन करून मातांना एआरटी उपचार व नवजात शिशूना नेव्हिरापीन सिरप देण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील ३ एआरटी केंद्रे व ११ लिंक एआरटी केंद्रांत ९ अशा एकूण ३९९ लोकांची प्री-एआरटी नोंदणी झाली आहे. त्यापैकी ८ हजार ३२१ जणांना एआरटी उपचार सुरू असून यामध्ये रायगड जिल्ह्यातील ४ हजारहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
ही आहेत करणे
एचआयव्हीबाधित व्यक्तीबरोबर असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यास एड्स पसरतो. एचआयव्हीबाधित व्यक्तीची इंजेक्शन सुई अबाधित व्यक्तीसाठी वापरल्यास त्यानेही संसर्ग होतो. तसेच एचआयव्हीबाधित रक्त दिल्यासही एड्स पसरतो. पालकांकडून त्यांच्या नवजात अर्भकासही होऊ शकतो, या सर्व कारणांमुळे एड्सबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे



























































