
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज रक्षाबंधनानिमित्त त्यांचे दिवंगत बंधू अजित पवार यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहली आहे. ”दाद आजही वाटतं तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील, बहिणींसोबत गप्पागोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील”, असे सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना राखी बांधतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यासोबत एक भावनिक पोस्ट लिहली आहे. त्या म्हणतात ”प्रिय दादा, आज राखीपौर्णिमा… पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे. सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं… यावर आजही विश्वास बसत नाही. लहानपणापासून एकत्र वाढताना आपली भांडणं, एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांविषयीचा अभिमान हाच आपल्या नात्याचा पाया होता. आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील, बहिणींसोबत गप्पागोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील. तुझ्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही. तू जिथे असशील, तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे.”


























































