
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा तन्नाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा अत्यंत आकर्षक, पारंपारिक आणि ट्रेंडी एथनिक लूक पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये करिश्माने परिधान केलेला सुरेख, नारंगी रंगाचा पारंपारिक आणि आकर्षक इथनिक अनारकली कुर्ती सूट तिच्या सौंदर्याला चारचाँद लावत आहे. या ड्रोसवर तिने गळ्यात हेव्ही गोल्ड ट्रॅडिशनल चोकर नेकलेस, मॅचिंग झुमके आणि हातात जाड गोल्डन कडे तसेच अंगठी परिधान करून आपला लुक अतिशय समृद्ध केला आहे. पायात घातलेली सोनेरी आणि रुपेरी रंगाची पारंपारिक कोल्हापुरी सँडल या संपूर्ण एथनिक लुकला परिपूर्णता देते. मोकळे सोडलेले केस, सोबर-नैसर्गिक मेकअप आणि कपाळावर लावलेली छोटीशी काळी टिकली तिच्या या मनमोहक आणि सोज्वळ रूपात अधिकच भर घालत आहे.




























































