
पवई आयआयटीच्या एनर्जी सायन्स आणि इंजिनीअरिंगच्या दुसऱया वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आज सायंकाळी आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर सर्व विद्यार्थ्यांनी पॅम्पसमध्ये काही वेळ निदर्शने केली.
मृत मुलगा हा आयआयटीच्या एनर्जी सायन्स-इंजिनीअरिंगच्या दुसऱया वर्षात शिकत होता. परीक्षे दरम्यान तो मुलगा परीक्षा कक्षात मोबाईल पह्न वापरताना आढळून आला. त्याने प्रश्नपत्रिका उत्तर मिळवण्यासाठी चॅट जीपीटीवर अपलोड केली होती. त्यानंतर संबंधित शिक्षक आणि विभाग प्रमुखाने त्या विद्यार्थ्याशी त्या विषयावर चर्चा केली होती. तसेच त्यांनी त्याचे समुपदेशन देखील केले होते. एवढंच नव्हे तर त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर काही परिणाम होणार नाही असे त्याला सांगितले होते. त्यानंतर तो मुलगा हा त्याच्या हॉस्टेलमधील खोलीत परतला. त्याने हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली.


























































